मनोरंजन

Golden Globes 2023 : नाटु नाटु! पंतप्रधानांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी केले कौतुक

'आरआरआर' चित्रपटाच्या 'नाटु नाटु' या गाण्याला मिळाला प्रतिष्टीत गोल्डन ग्लोब (Golden Globes 2023) पुरस्कार

प्रतिनिधी

जगभर गाजलेला प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला ग्लोबल सन्मान मिळाला आहे. या चित्रपटाचे गाणे 'नाटु नाटु' या गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अशामध्ये देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते, अभिनेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, " तुम्ही खूप मोठे यश संपादन केले, त्यासाठी 'आरआरआर' च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुम्ही हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवल्याने साऱ्या भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला."

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या पुरस्काराबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनीदेखील अभिनंदन करताना म्हंटले की, "संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुम्ही या सन्मानासाठी पात्र आहात, सर्वोत्तम कामगिरी!

अभिनेता शाहरुख खानने ट्विट करत म्हंटले की, "मी नुकताच उठलो आणि 'नाटू नाटू’ गाण्याला गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाल्याचे ऐकून नाचू लागलो. ही भारतासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे."

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी