अभिनेता सलमान खान याची SRA कार्यालयाला सदिच्छा भेट X | PTI
मनोरंजन

अभिनेता सलमान खान याची SRA कार्यालयाला सदिच्छा भेट

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई (एसआरए) कार्यालयास शुक्रवारी अभिनेते सलमान खान याने सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान एसआरएच्या विविध उपक्रमांची माहिती घेत त्याने संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई (एसआरए) कार्यालयास शुक्रवारी अभिनेते सलमान खान याने सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान एसआरएच्या विविध उपक्रमांची माहिती घेत त्याने संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सलमान खान यांच्या हस्ते एसआरएच्या विदा संकलन व आयटी सर्व्हर रूम या अत्याधुनिक आयटी सर्व्हर रूमचे उद्घाटन करण्यात आले.

या भेटीदरम्यान सलमान खान याच्या हस्ते एसआरएच्या कार्यप्रणाली, पुनर्वसनाची यशोगाथा, विविध विकास प्रकल्प तसेच संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीचे प्रभावी दस्तावेजीकरण करणाऱ्या एसआरए कॉफी टेबल बुकचे अनावरण झाले.

एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अभिनेते सलमान खान याच्या हस्ते पन्नासहून अधिक पात्र झोपडीधारकांना त्यांच्या स्वप्नातील हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी शासन आणि एसआरएबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुनर्वसन प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी एसआरएचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन