मनोरंजन

"मी कोणाचं करिअर संपवलं? संपवायचं असेल तर..."; दिग्दर्शक अभिनव कश्यपच्या गंभीर आरोपांवर सलमान खानने सोडलं मौन

अभिनव कश्यपने अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोपांची राळ उठवली होती. करिअर संपवण्याची धमकी देण्यापासून ते सलमानचे कुटुंब खुनशी असल्याचे आरोप त्याने केले होते. ‘Bigg Boss 19’ मधील ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने या आरोपांवर भाष्य केलंय."मी कोणाचं करिअर संपवलं?...

Mayuri Gawade

दिग्दर्शक अभिनव कश्यपने अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोपांची राळ उठवली होती. करिअर संपवण्याची धमकी देण्यापासून ते सलमानचे कुटुंब खुनशी असल्याचे आरोप त्याने केले होते. अखेर त्याच्या आरोपांवर सलमान खानने मौन सोडल्याचं दिसतंय.

अलीकडेच ‘Bigg Boss 19’ मधील ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने या आरोपांवर भाष्य केलंय. ‘वीकेंड का वार’मध्ये Bigg Boss 13 ची स्पर्धक शहनाज गिल आली होती. तिचा भाऊ शेहबाज बादेशा याच्या वाइल्ड कार्ड एंट्रीसाठी शहनाजने उपस्थिती लावली होती. यावेळी, सर माझी एक विनंती आहे...तुम्ही इतक्या जणांचं करिअर घडवलंय...असे शहनाज म्हणाली. ही संधी साधत सलमानने अभिनव कश्यपने केलेल्या आरोपांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.

...तर मी स्वतःचंच करिअर खाईन (संपवेल)

"मी कुठं कोणाचं करिअर घडवलंय...करिअर घडवणारा तर तो वरचा आहे...उलट माझ्यावर तर कित्येकांचं करिअर संपवण्याचा डाग लावलाय...पण असं काहीही नाहीये...करिअर संपवण्याचं तर माझ्या हातातच नाहीये...पण आजकाल हे सर्व चालतं ना...करिअर संपवेल वगैरे....कोणाचं करिअर खाल्लं (संपवलं) मी? आणि जर खायचंच असेल ना तर मी स्वतःचंच करिअर खाईन, असे सलमान म्हणाला.

सलमान खान गुंड, उद्धट माणूस - अभिनव कश्यप

'दबंग' सिनेमाला १५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनवने 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत सलमान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. “सलमानला अभिनयात काहीही रस नाही. गेली २५ वर्षे तो फक्त कामावर येऊन लोकांवर उपकार करतोय अशी त्याची वृत्ती आहे. त्याला अभिनयापेक्षा सेलिब्रिटी असण्याची ताकद महत्त्वाची वाटते. तो कधीही खऱ्या अर्थाने चित्रपटात सहभागी होत नाही. 'दबंग' करण्यापूर्वी मला हे ठाऊक नव्हतं. तो एक गुंड आहे. तो उद्धट आणि वाईट माणूस आहे. बॉलिवूडमध्ये स्टार सिस्टीम उभारण्यामागे सलमान आणि त्यांचं कुटुंब जबाबदार आहे. पन्नास वर्षांपासून या इंडस्ट्रीत असलेलं हे कुटुंब केवळ स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवत आलं आहे. बदला घेण्याची खुनशी प्रवृत्ती त्यांच्यात ठासून भरलेली आहे. कोणी त्यांच्याशी असहमत झालं, तर ते त्याच्यामागे लागतात. त्यांना लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवायचं असतं.” ‘दबंग’ सुपरहिट ठरल्यानंतर २०१० मध्ये खान कुटुंबाने अभिनवला त्याचा दुसरा भाग दिग्दर्शित करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्याने हा प्रस्ताव नाकारला. अभिनवचा आरोप आहे की, “मी ‘दबंग २’ करण्यास नकार दिल्यानंतर खान कुटुंबाने माझं करिअर संपवून टाकण्याची धमकी दिली.” हे प्रकरण झाल्यापासूनच अभिनव सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात उघडपणे बोलताना दिसतो.

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी

‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज