मनोरंजन

समांथा लवकरच होणार आई? व्हायरल व्हिडीओत दिसला बेबी बंप

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये बेबी बंप दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. समांथा गरोदर असल्याच्या वृत्तांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Mayuri Gawade

साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. समांथाचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

अलीकडेच समांथाने तिच्या 'मा इंटी बंगारम' या चित्रपटाच्या यशानिमित्त टीमसोबत छोटेखानी सेलिब्रेशन केलं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओमध्ये समांथा जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसत असून, तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत आहे. तिच्या या लूकमुळे चाहत्यांमध्ये विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

लग्नानंतर नव्या चर्चांना सुरुवात

समांथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून अनेक चर्चा सुरू आहेत. दोघांनी १ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता.

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

माध्यमांतील वृत्तांनुसार, समांथा गरोदर असल्याची चर्चा असून, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. मात्र, समांथा किंवा राज यांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

एकत्र काम करताना जुळले सूर

दरम्यान, समांथा आणि राज यांनी यापूर्वी 'द फॅमिली मॅन' आणि 'सिटाडेल' या लोकप्रिय वेब सीरिजसाठी एकत्र काम केलं आहे. आता व्हायरल व्हिडीओनंतर चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

Thane : झेडपीच्या शाळांकडे पालकांचा ओढा; इयत्ता पहिलीत ८ हजार २८० विद्यार्थ्यांचा प्रवेश