मनोरंजन

'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातामध्ये निधन

वैभवीच्या कारला हिमाचल प्रदेशात अपघात झाला. रस्त्यात एका तीव्र वळणावर कारचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला

नवशक्ती Web Desk

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेत जास्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे निधन झाले. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. प्रवासाची आवड असलेली वैभवी तिच्या पतीसोबत उत्तर भारतात फिरायला गेली होती. तिथे एका कार अपघातात तिचा मृत्यू झाला. जे.डी. मजेठिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली. वैभवीच्या पार्थिवावर आज (बुधवारी) सकाळी 11 च्या सुमारास मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 23 मे (मंगळवार) दुपारी वैभवीच्या कारला हिमाचल प्रदेशात अपघात झाला. रस्त्यात एका तीव्र वळणावर कारचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. निर्माते जे.डी. मजेठिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहून शोक व्यक्त केला. 

मालिकांसोबतच वैभवीने चित्रपटांमध्येही काम केले आहे. दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या वर्षी रिलीज होणाऱ्या 'तिमिर' चित्रपटातही तिने काम केले आहे. याशिवाय तिने सीआयडी, अदालत यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. एकाच आठवड्यात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील दोन कलाकारांच्या मृत्यूने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 22 मे रोजी अभिनेता आदित्य सिंग राजपूत यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यानंतर आता वैभवीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण