मनोरंजन

पहिल्यांदाच शाहरुख आणि आर्यन दिसणार एकत्र ; 'या' शो'मध्ये लावणार हजेरी

आर्यन खान हा लवकर बॉलिवूडमध्ये दणदणीत आगमन करणार आहे

नवशक्ती Web Desk

बॉलिवूडचा बादशाह म्हणून अभिनेता शाहरुख खान याला ओळखल जातं. त्याची जबरदस्त अशी फॅन फोलोइंग देखील आहे. त्याची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते शेकडो किमीवरुन त्याच्या मुंबईतील मन्नत या बंगल्याबाहेर हजेरी लावतात. चाहत्यांमध्ये त्याची मोठी क्रेझ आहे. त्याने त्याच्या 'पठाण' या सिनेमाद्वारे तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत धमाका केला. हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

या नंतर या बॉलिवूडच्या बादशहानने लगेच त्याच्या आगामी 'डंकी' आणि 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याच्या पठाण चित्रपटात चाहत्यांना डबल धमाका बघण्यास मिळाला आहे. शाहरुख सोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची देखील झलक या सिनेमात बघायला मिळाली आहे.

आता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान हा देखील लवकर बॉलिवूडमध्ये दणदणीत आगमन करणार आहे. आर्यन खानच्या आगामी वेब सीरिजची शूटिंग देखील सुरु करण्यात आली आहे. सध्या चाहते 'कॉफी विथ करण 8' या करण जोहरच्या शो'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कॉफी विथ करण 7' शो'च्या सीजनमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली नसल्याने चाहते नाराज झाल्याचं बघायला मिळालं होत.

एका रिपोर्टनुसार 'कॉफी विथ करण 8' मध्ये फक्त शाहरुख हाच नाही तर त्याचा मुलगा आर्यन खान देखील सहभागी होणार आहे. यानिमित्ताने या बापलेकांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यामुळे चाहते या शो'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्यामधील नातं कस आहे हे देखील या शोमध्ये बघायला मिळेल.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी