मनोरंजन

Shivani Surve: शिवानी सुर्वे दिसणार एका अनोख्या आणि रांगड्या अंदाजात!

After Operation London Cafe: प्रेक्षकांनी शिवानी सुर्वेला याआधी कधीही अशा धाडसी भूमिकेत पाहिलं नसेल.

Tejashree Gaikwad

Upcoming Movie: 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, आणि त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या सिनेमात शिवानी सुर्वेची भूमिका विशेष चर्चेत आहे, आणि तिच्या चाहत्यांसाठी हा लूक एक नवीन आणि खतरनाक अनुभव देणारा ठरला आहे.

शिवानी सुर्वेच्या लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ती हातात बंदूक, गळ्यात लाल ओढणी, फायटिंग सीन्स, आणि चेहऱ्यावर रक्त अशा अनोख्या अवतारात दिसत आहे. तिच्या चाहत्यांसाठी हा लूक खूपच अनपेक्षित आहे. बिनधास्त, बेधडक, आणि तितकीच डेंजर अशी ही शिवानी सुर्वे प्रेक्षकांना एकदम नवीन अनुभव देत आहे.

निर्माते दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, आणि रमेश कोठारी यांनी या सिनेमाच्या भव्यदिव्य अनुभवासाठी एकत्र येऊन एक थरारक कथा साकारली आहे. शिवानीची भूमिका आणि तिच्या अभिनयाची झलक पाहून प्रेक्षकांची अपेक्षा वाढल्या आहेत.

शिवानीने या सिनेमात साकारलेल्या जबरदस्त भूमिकेची चर्चा सध्या मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही आहे. तिच्या अप्रतिम अभिनयामुळे आणि दमदार व्यक्तिमत्त्वामुळे तिचा फॅनबेस आणखी विस्तारत आहे. "ही शिवानी सुर्वेच ना?" अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

शिवानीच्या या नवीन रूपाने दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र दिग्दर्शित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' सिनेमाला एक वेगळं आकर्षण दिलं आहे. तिच्या या अनोख्या अंदाजाची चर्चा आणि सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. शिवानी सुर्वे साऊथचे कलाकार कविश शेट्टी आणि मेघा शेट्टी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत असून विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांसारखे मराठी कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

'लाडकी बहीण' योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट ; महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत होणार कारवाई

MMRDA ला अखेर जाग; मोनोरेलची प्रवासीक्षमता निश्चित; गाड्यांची तपासणी होणार

MIDC मधील झोपड्या ४ महिन्यांत हटवा; मुंबई उच्च न्यायालयाचे नवी मुंबई पालिकेला आदेश

Mumbai : पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद; जैन समाजाची मागणी BMC कडून मान्य

विम्याचा हप्ता होणार कमी; आरोग्य-जीवनविम्याला GST तून वगळणार?