@savanieeravindrra/ Instagram
मनोरंजन

"अनेक वर्ष मतदान करते तिथेच माझं नाव नाही.." गायिका सावनी मतदानाला मुकली

Tejashree Gaikwad

Pune Lok Sabha Election 2024: देशात अनेक ठिकाणी आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावलाय. परंतु या दरम्यान अनेक मतदारांची, कलाकारांचीही मतदान यादीत नाव नसल्याचं समोर येत आहे. ज्या मतदान केंद्रावर ते वर्षानुवर्षे मतदान करत आहेत. त्याच ठिकाणी यंदा त्यांचं नाव नसल्याचं समजत आहे. अभिनेता सुयश टिळकनंतर आता प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र (Savani Ravindra) हिलाही याचा फटका बसलाय.

मतदान केंद्रावर जाऊनही मतदान यादीतच नाव नसल्यामुळे सावनीने एक पोस्ट लिहित सांगितले की, "गेले अनेक दिवस सर्व ऑनलाईन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज वोटींग बूथ ला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. मी या ठिकाणी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे. तरीही तिथे नाव सापडले नाही. त्या बूथला आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही. या बद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरशी त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. अत्यंत खेदजनक असा हा प्रकार आहे."

पुणे मतदार संघात अनेकांची नाव न सापडल्याने गोंधळ झाला आहे. सकाळच्या ११ वाजताच्या आकडेवारीनुसार पुण्यात फक्त १६.१६% मतदान झालं आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस