मनोरंजन

सोनाली आणि गश्मीरने केली लिटिल मास्टर्स सोबत धमाल

कार्यक्रमाचे परीक्षक गश्मीर महाजनी आणि सोनाली कुलकर्णी नुकतंच या कार्यक्रमातील लिटिल मास्टर्स सोबत धमाल मजा मस्ती करताना दिसले

वृत्तसंस्था

डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम या आठवड्यात बुधवार पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांसोबतच छोट्या दोस्तांना देखील या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे कारण या कार्यक्रमात चिंचि चेटकीण तिच्या जादूने गम्मत आणणार आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक गश्मीर महाजनी आणि सोनाली कुलकर्णी नुकतंच या कार्यक्रमातील लिटिल मास्टर्स सोबत धमाल मजा मस्ती करताना दिसले. हो हे खरं आहे. नुकतंच एका मॉलमध्ये डान्स महाराष्ट्र डान्स मधील स्पर्धक फ्लॅशमॉब करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतानाच सोनाली आणि गश्मीर देखील तिथे उपस्थित राहिले आणि इतकंच नव्हे तर त्यांनी देखील या छोट्या दोस्तांसोबत डान्स केला. लिटिल मास्टर्सचा डान्स आणि त्यांना मिळालेली सोनाली आणि गश्मीरची साथ त्याच्यामुळे तिथे उपस्थित सर्व लोकांमध्ये देखील एक वेगळाच उत्साह संचारला. सर्वजणांनी या लिटिल मास्टर्सच्या बाजूला घोळका केला आणि त्यांना प्रोत्साहन देखील दिलं. गश्मीर आणि सोनालीने सार्वजणांना डान्स महाराष्ट्र डान्स पाहण्याचं आवाहन केलं.

काश्मीर स्फोटात ९ जण ठार ३२ जखमी

आजचे राशिभविष्य, १६ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय