मनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेता सुर्याचा शुटिंगदरम्यान अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

चेन्नईत कांगुवा या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना हा अपघात झाला असल्याची माहिती आहे.

नवशक्ती Web Desk

दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्या हा त्याच्या आगामी कांगुवा या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, सुर्याबाबत एक बातमी समोर आल्याने त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. चित्रपटाची शुटिंग सुरु असताना सुर्याचा अपघात झाला असून यात तो गंभीर जखमी झाला असल्याचं बोललं जात आहे. यानंतर तात्काळ शुटिंग युनिटला तात्काळ अलर्ट करण्यात आला आहे.

अपघात घडल्यानंतर सुर्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूर्याला या अपघातात गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. चेन्नईत कांगुवा या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना हा अपघात झाला असल्याची माहिती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटाच्या शुटिंगवेळी एक सीन शुट करत असताना सूर्यावर कॅमेरा पडून हा अपघात झाला. यात त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. सुर्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

BMC निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितचं ठरलं! दोन्ही पक्षांची युती जाहीर, जागावाटपही निश्चित

Mumbai : १० कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा; २ महिलांना पोलीस कोठडी, मराठी अभिनेत्रीचाही सहभाग

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

'पटक पटक के मारुंगा…' एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला जाणाऱ्या प्रवासी महिलेला ऑटोचालकाकडून धमकी; Video व्हायरल