मनोरंजन

'रांझणा'च्या टीमकडून 'तेरे इश्क में' ची घोषणा

धनुषचा नवा चित्रपट, आनंद एल राय यांची निर्मिती

नवशक्ती Web Desk

" रांझणा " या चित्रपटाने तब्बल 10 वर्ष पूर्ण केली असून आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या सुपरहिट चित्रपटाची 10 वर्ष पूर्ण करत असताना आनंद एल राय त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. "तेरे इश्क में" हा नवा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ही फक्त एक घोषणा नसून यात अजून एक खास सरप्राइज आहे ते म्हणजे अभिनेता धनुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समजतंय. आनंद एल राय आणि धनुष ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम करणार आहे आणि यातून नक्कीच काहीतरी अफलातून कलाकृती घडणार आहे यात शंका नाही.

ही धमाकेदार घोषणा केल्या नंतर दिग्दर्शक आनंद एल राय म्हणतात, "धनुषसोबत 'तेरे इश्क में' या आमच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आज सारखा खास दिवस आला आहे हा एक अनोखा योगायोग आहे. 'रांझणा' हा एक चित्रपट नसून ती एक भावना आहे. माझ्या हृदयात या चित्रपटासाठी विशेष प्रेम आहे. जगभरातील चाहत्यांकडून या चित्रपटा साठी मिळणार प्रेम नक्कीच हृदयस्पर्शी आहे."

धनुषने रांझणा द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि तो आजच्या काळातील सर्वात मोठा स्टार म्हणून नाव कमावतो आहे. त्याच्या अफाट प्रतिभेने त्याला दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपट उद्योगांमध्ये मोठा चाहतावर्ग मिळवून दिला आहे. तब्बल 10 वर्षांनी पुन्हा ' तेरे इश्क में' या चित्रपटातून पुन्हा एक जादुई अनुभव अनुभवयाला मिळणार यात शंका नाही.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत