मनोरंजन

थलायवा लखनौ दौऱ्यावर ; योगी आदित्यानाथ यांना दाखवणार 'जेलर'

'जेलर' या चित्रपटाची कमाई आणि क्रेझ पाहता हा चित्रपट आणखी अनेक रेकॉर्ड करेल अशी अपेक्षा सगळयांना आहे.

नवशक्ती Web Desk

साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचे चाहते जगभरात पसरले आहेत. साऊथमधील लोकांनी त्याला देवाचा दर्जा दिला आहे. काही दिवसांपूर्वी रंजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याचा परिणाम सनी देओल आणि अमीषा पटेलच्या 'गदर 2' या सिनेमावर देखील झाला आहे. सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाने भारतात 300 कोटींची कमाई केली नसली तरी जगभरात या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'जेलर' या चित्रपटाची कमाई आणि क्रेझ पाहता हा चित्रपट आणखी अनेक रेकॉर्ड करेल अशी अपेक्षा सगळयांना आहे. 'जेलर' चित्रपटाच्या यशाने निर्माते खूप खुश आहेत. रजनीकांत सध्या देवदर्शनाला गेला आहे. रजनीकांतने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कसलीही कमी सोडली नाही. या संदर्भात आता तो लखनौला पोहोचला आहे.

रजनीकांत लखनौला जाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्र्यांना 'जेलर' चित्रपटही दाखवणार आहे. शुक्रवारी रजनीकांत हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पोहचला. तिथे पोहचताच त्याने माध्यम प्रतिनिधींशी गप्पा देखील मारल्या. त्यावेळी त्याने सांगितलं की, "यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत माझा 'जेलर' चित्रपट पाहणार आहे. चित्रपटाच्या यशावर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "हे सर्व देवाचे आशीर्वाद." रजनीकांत सध्या अनेक शहरांना भेट देताना दिसत आहे.

लखनौ दौऱ्यात रजनिकांत काही अध्यात्मिक स्थळांनाही जाऊन भेट देणार आहे. हिमालयापासून त्याने त्याच्या धार्मिक यात्रेला सुरुवात केली असून त्यानंतर त्याने झारखंड येथील छिन्नमस्ता मंदिरात देवाचं दर्शन घेतलं. तिथले त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 'जेलर' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर'मध्ये रजनीकांत बरोबर रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि कॉमेडियन योगी बाबू यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल