मनोरंजन

‘बिग बॉस’ विजेत्याकडून खंडणी मागणाऱ्याला अटक ;गुरुग्राम पोलिसांनी ठोकल्या बेड्या

समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्याला धमकी देत एक कोटी रुपयांची मागणी केली.

नवशक्ती Web Desk

गुरुग्राम : ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव याच्याकडे एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर या खंडणीखोराला गुरुग्राम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला गुजरातमधून उचलले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, एल्विश यादव याला एक फोन आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्याला धमकी देत एक कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी एल्विश याने गुरुग्राम पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर गुजरात पोलिसांनी गुजरातच्या वडनगर येथून शाकीर मकरानी (२४) या संशयिताला अटक केली. बिग बॉसचा विजेता आणि यूट्यूब इन्फ्लुएन्सर असलेल्या एल्विश यादवने २५ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. १७ ऑक्टोबरच्या आसपास त्याला धमकीचे काही कॉल आणि मेसेजस आले. त्याद्वारे त्याच्याकडे आधी ४० लाख रुपये आणि नंतर १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली’ असे पोलिसांनी सांगितले.

BMC Election : मुंबईतील प्रचारासाठी भाजपला हवीये यूपीतील नेत्यांची मदत; अपर्णा यादव, रवि किशनसह 'या' नेत्यांना पाठवण्याची विनंती

"लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही"; भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी विलासरावांबाबत केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखचा सणसणीत पलटवार

Mumbai : घरात प्रचाराला विरोध केल्याचा राग; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये दोघांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं, बेदम मारहाणीचा Video व्हायरल

'समृद्धी'वर पुन्हा थरार! धावत्या बसने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचले ३५ प्रवासी

महाराष्ट्राला पुन्हा भरणार हुडहुडी! उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ९ ते १५ जानेवारी या कालावधीत तापमान घटणार