मनोरंजन

'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये दिसणार खरे वॉरियर्स

विवेक अग्निहोत्रीचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'च्या शूटिंगची सुरुवात

प्रतिनिधी

विवेक अग्निहोत्रीचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'च्या शूटिंगची सुरुवात झाली आहे. हा चित्रपट भारतीय शास्त्रज्ञांसह त्या लोकांवर आधारित आहे ज्यांनी जगातील सर्वात प्रभावी लस तयार करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ रात्रंदिवस मेहनतीने काम केले. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “From the sets of #TheVaccineWar. Independence Day. 2023”.

हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “हे सिख वोलेंटीअर्स आहेत ज्यांनी दुसऱ्या लाटेत आपला जीव धोक्यात घालून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात मदत केली. 'द व्हॅक्सिन वॉर' ही एक सत्य कथा आहे, त्यामुळे आम्ही शक्य तितक्या रिअल लोकांना कास्ट करत आहोत. ही सत्यकथा भारतातील खऱ्या योद्ध्यांसह एक सहयोगी चित्रपट व्हावी अशी आमची इच्छा आहे. जगातील काही प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्यासह सखोल संशोधनावर आधारित हा भारतातील ‘सत्यकथा’ शैलीतील पहिला चित्रपट असणार आहे. 'द व्हॅक्सिन वॉर'या चित्रपटामार्फत भारतीय सिनेमांना एका नव्या स्तरावर नेण्याचा आणि चित्रपटांना भारताची सॉफ्ट पॉवर म्हणून वापरण्याचा प्रयत्न आहे."

महामारीच्या काळात जगातील इतर देशांप्रमाणेच भारतानेही गेल्या दोन वर्षांत अनेक संकटांचा सामना केला आहे. तसेच, अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी लस तयार करण्यासाठी आणि डॉक्टरांनी रुग्णांचे उपचार करण्यासाठी खूप मेहनत केली. जिथे लोक कोरोनावरील विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते तिथे काही एजन्सी, पक्ष आणि मीडिया हाऊसेस सतत या विजयाची बदनामी करण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. तेव्हापासून, विवेक अग्निहोत्री नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असून त्यांचा पर्दाफाश करत आहेत. तसेच, भारतात बनवण्यात आलेली लस इतकी प्रभावी ठरली आहे की, देशाची लोकसंख्या १.४ अब्ज असूनही, नागरिकांवर कोरोनाचा परिणाम झालेला नाही. त्याचवेळी चीन, ब्रिटन आणि इतर अनेक देश २०२३ मध्ये कोरोनाशी झुंज देत आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द व्हॅक्सिन वॉर'हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी ११ भाषांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी