मनोरंजन

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी; सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू

हा प्रकार उघडकीस येताच अनुपम खेर यांच्या वतीने आंबोली पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Swapnil S

मुंबई : सिने अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे चार लाखांची कॅश आणि एक निगेटिव्ह रिळ चोरी करून पलायन केले. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून दोन तरुणांनी आत प्रवेश करून ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याच फुटेजवरून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनुपम खेर यांचे अंधेरीतील वीरा देसाई रोडवर एक खासगी कार्यालय आहे. बुधवारी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी काम संपल्यानंतर लॉक लावून निघून गेले होते. रात्री उशिरा दोन तरुण त्यांच्या कार्यालयात घुसले, त्यांनी ड्रॉव्हरमधील चार लाखांची कॅश आणि एक निगेटिव्ह रिळ घेऊन पलायन केले. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच अनुपम खेर यांच्या वतीने आंबोली पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

GST ५ आणि १८%; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा