मनोरंजन

'आदिपुरुष'मधील 'जय श्री राम' गाण्याने 'या' गाण्याला मागे टाकत केला नवा रेकॉर्ड

रिलीज झाल्यानंतर 24 तासात या गाण्याने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

नवशक्ती Web Desk

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या 'आदिपुरुष' या सिमेमाची सध्या सर्विकडे चर्चा सुरु आहे. दक्षिणात्य अभिनेता प्रभास या सिनेमात प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारत आहे. 'आदिपुरुष'चे ट्रेलर रिलीज झाले झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला उडंत प्रतिसाद मिळाल्याचे पाहावयास मिळाले. आता या सिनेमाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात रामभक्तीचा जागर करण्यात आला आहे. रिलीज झाल्यानंतर 24 तासात या गाण्याने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

रामभक्तीचा जागर असलेले 'जय श्री राम राजा राम' या गाण्याने रिलीज होतात 24 तासात एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. प्रेक्षकांनी या गाण्याला डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे. मनोज शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत, तर मराठमोळ्या अजय-अतूलच्या जोडीने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्याने गेल्या 24 तासात यू ट्यूबवर सर्वाधीक व्ह्यूज मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. रिलीज झाल्यानंतर 24 तासात या गाण्याला सर्वाधिक पाहीले गेले आहे. 'जय श्री राम राजा राम' या गाण्याने 24 तासात 2 कोटी, 62 लाख 11 हजार 237 व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 4 लाख 84 हजार 186 लाईक्स मिळाले आहेत. हा रेकॉर्ड नावावर करत या गाण्याने बॉलिवुडच्या खिलाडी असलेल्या अक्षय कुमारच्या 'क्या लोगे तुम' या गाण्याला मागे टाकले आहे.

मुंबईमध्ये हे गाणे अनोख्या पद्धतीने रिलीज करण्यासाठी 'आदिपुरुष'च्या टीम ने विशेष तयारी केली होती. संगीतकार अजय- अतुल यांच्यासह 30 जाणांच्या टीमने लाईव्ह परफॉर्म केल्यावर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे मोठ्या भक्ती भावाने बनवण्यात आल्याचे आदिपुरुषच्या टीमने सांगितले.

या चित्रपटात प्रभू रामचंद्रांच्या भूमीकेत दक्षिणात्य अभिनेता प्रभास दिसणार आहे. तर सीतामातेची भूमिका अभिनेत्री क्रिती सेनॉन साकारणार आहे. तसेच मराठमोळ्या देवदत्त नागे यांने या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे. या चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांना 16 जून पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...