मनोरंजन

Tiger 3 OTT Release: आता घर बसल्या बघता येणार 'टायगर 3','या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

'टायगर 3' हा चित्रपट YRFस्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट असून 'टायगर' फ्रँचायझीचा तिसरा सिनेमा होता

नवशक्ती Web Desk

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा 'टायगर ३' हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. सलमान खानच्या 'टायगर ३' या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलिज होऊन या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.

'टायगर 3' हा चित्रपट YRFस्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट असून 'टायगर' फ्रँचायझीचा तिसरा सिनेमा होता. या चित्रपटात प्रेक्षकांना परत एकदा कतरिना आणि सलमानची जोडी पद्यावर पहायला मिळाली. तर यावेळी इम्रान खान 'टायगर ३'मध्ये खलनायकाच्या भुमिकेत दिसला. 'टायगर ३' या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोललं तर 'टायगर 3' चित्रपटाने जगभरात तब्बल 450 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

सलमान खानचे चाहते अजूनही या चित्रपटाला पसंती देत आहे. तर हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, 'टायगर 3' चे डिजिटल अधिकार Amazon प्राइम व्हिडिओला मोठ्या रकमेत विकले गेले आहेत. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र 'टायगर 3' च्या OTT रिलीज तारखेची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र, हा चित्रपट जानेवारीच्या सुरुवातीस ओटीटीवर येणार आहे अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे.

मनीष शर्मा यांनी 'टायगर ३' चे दिग्दर्शिन केलं आहे. 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. 2012 मध्ये एक था टायगर आणि 2017 मध्ये टायगर जिंदा है या चित्रपटाच्या यशानंतर 'टायगर 3' रिलिज झाला. या चित्रपटांची निर्मिती आदित्य चोप्राने केली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी