मनोरंजन

उर्फी जावेदने हिंदुस्थानी भाऊंवर केली टीका, म्हणाली 'मला माझ्या सुरक्षिततेची काळजी आहे'.

"तुम्ही ज्या शिव्या देता ती आपली रीत आहे का, ते आपल्या संस्कृतीत येत का? आणि त्यामुळे समाजावर चुकीचा संदेश नाही का जात किंवा वाईट प्रभाव नाही का पडत?"

प्रतिनिधी

उर्फी जावेद तिच्या विचित्र किंवा बोल्ड पोशाखांसाठी ओळखली जाते. प्रत्येक वेळी उर्फी सार्वजनिक ठिकाणी तिच्या पेहरावरून पाराझींचे तिच्याकडे लक्ष खेचून घेण्यात ती यशस्वी ठरते.  सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना करणारी उर्फी जावेद नेहमीच त्यांना हटके उत्तरं देत असते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओलादेखील तिने अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे.  

काय आहे हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ ?

हा व्हिडिओ उर्फी जावेदसाठी आहे, जी आजकाल स्वत:ला मोठी फॅशन डिझायनर समजायला लागली आहे. फॅशनच्या नावाखाली तू जसे कपडे घालतेस, त्याने समाजावर वाईट प्रभाव पडत आहे. ही भारताची संस्कृती नाहीये. तुझ्यामुळे इतर मुलींपर्यंत चुकीचा संदेश पोहोचत आहे वेळीच सुधर. नाहीतर मी तुला सुधारेन. भाऊ म्हणून सांगतोय आत्ताच सुधर”, असं म्हणत व्हिडिओच्या माध्यमातून हिंदुस्थानी भाऊने अप्रत्यक्षरीत्या उर्फी जावेदला धमकी दिली आहे.

हिंदुस्थानी भाऊवर आक्षेप घेत एक लांब नोट लिहिली. यानंतर तिने त्याला भूतकाळात त्याच्याच एका व्हिडिओची आठवण करून दिली आणि दावा केला की ३ महिन्यांपूर्वी या माणसाला माझ्या कपड्यांबद्दल काही आक्षेप नव्हता. त्याला उत्तर देत ती असं म्हणाली कि "तुम्ही ज्या शिव्या देता ती आपली रीत आहे का, ते आपल्या संस्कृतीत येत का? आणि त्यामुळे समाजावर चुकीचा संदेश नाही का जात किंवा वाईट प्रभाव नाही का पडत?" आता अचानक माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या कपड्यांबाबत बोलत आहे. प्रसिद्धीसाठी हापापलेले असे लोक काहीही करु शकतात" असं म्हणत तिने तिच्या सुरक्षिततेची काळजी व्यक्त केली आहे.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी