मनोरंजन

Vat Purnima 2024: मराठी मालिकांमध्ये साजरी होणार वट पौर्णिमा, प्रसारित होणार विशेष भाग!

Marathi Serial Update: झी मराठीच्या 'शिवा', 'पारू', 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'नवरी मिळे हिटलर'ला आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांचे वट पौर्णिमा विशेष भाग प्रसारित होणार आहेत.

Tejashree Gaikwad

Zee Marathi: वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी, वडाच्या झाडाची पूजा करून आणि उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. ह्या वटपौर्णिमेच्या निमताने तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये वटपौर्णिमा विशेष भाग साजरे होणार आहेत.

तुला शिकवीन चांगलाच धडा

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघेही घर सोडून नवीन संसार सुरु करण्याच्या उंबरठयावर आहेत. अक्षराने, वट सावित्रीचा उपवास धरला आहे, अक्षराला इतके कष्ट घेताना बघून अधिपती देखील पूजेमध्ये तिच्या सोबत आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या दोघांवर एक विशेष गाणं देखील चित्रित झालं आहे.

नवरी मिळे हिटलरला

'नवरी मिळे हिटलरला' मध्ये दुर्गा, कालिंदी समोर जहागीरदार घराण्याच्या एका अश्या प्रथेचा उल्लेख करते ज्या मध्ये जर नव्या नवरीने वडाच्या झाडाला १००१ फेऱ्या मारल्या तर संसार सुखाचा होतो. कालिंदीच्या मनात ती गोष्ट घर करून आहे आणि ती लीला कडून १००१ फेऱ्या मारून घेण्याचा निश्चय करते. फेऱ्या मारताना लीलाची तब्बेत बिघडते आता अभिराम ह्यात लीलाला कशी साथ देतो हे पाहणं रंजक असणार आहे.

पारू

'पारू' मालिकेत अहिल्यादेवी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांसाठी जेवण बनवायचे ठरवते तर दुसरीकडे कोणाच्याही नकळत पारू वडाच्या झाडाची पूजा करायचे ठरवते. वटपौर्णिमेच्या दिवशी पारू आदित्यच्या ताटातलं उष्ट जेवण जेवते हे सगळं सावित्री पाहते. पारूचं सत्य सावित्रीसमोर येईल ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शिवा

'शिवा' च्या पहिल्या वट सावित्री पूजेसाठी रामभाऊ आणि पूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण ह्या हातापायीत आशूवर वार होतो तिकडे शिवा आशूच्या मदतीला येते. वट सावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा ह्या गुंडांना पासून कशी करणार हे पाहायला मिळणार.

पुन्हा कर्तव्य आहे

'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये वसुंधरा आपल्या जुन्या नात्यांच्या धाग्यांना तोडून आकाश सोबत एक नवीन विश्व् उभारण्याचा निर्णय घेईल का हे ह्या वटपौर्णिमा विशेष मिळणार आहे. हा मोठा निर्णय घेत असताना वसुंधराचा भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा राहणार का?

'वटपौणिमा विशेष भाग' 'तुला शिकवीन चांगलाच धडा' रात्री ८ वा. , 'शिवा' रात्री ९:०० वा., 'पारू' संध्या. ७:३० वा., 'नवरी मिळे हिटलरला' रात्री १० वा., 'पुन्हा कर्तव्य आहे' रात्री ९:३० वा.

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी