मनोरंजन

Ved Movie : रितेशच्या 'वेड'ने मोडला या ब्लॉकब्लस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड; घोडदौड सुरूच

अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' (Ved Movie) या मराठी चित्रटाने आपली यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली असून मराठी चित्रपट सृष्टीतले अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

प्रतिनिधी

अभिनेता रितेश देशमुख अभिनित आणि दिग्दर्शित 'वेड' या मराठी चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः उचलून धरले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करत असून गेल्या ११ दिवसांमध्ये ३५ कोटींहून अधिकच गल्ला कमावला आहे. विशेष म्हणजे सैराटनंतर अशी कामगिरी करणारा हा दुसराच चित्रपट ठरला आहे. सैराटने ११ दिवसांमध्ये ४० कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे, 'वेड'ने रितेशच्याच 'लय भारी' चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे, एका दिवसामध्ये सर्वाधिक कमाईच्या बाबतीतही 'वेड'ने सैराटलादेखील मागे टाकले. कारण, दुसऱ्या रविवारी 'वेड' या चित्रपटाने तब्बल ५.७० कोटींची कमाई केली. 'वेड' चित्रपटाने ११ दिवसांमध्ये ३५.७७ कोटींची कमाई करून 'लय भारी'ला मागे टाकले. 'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. यावेळी पहिल्याच तब्बल २.२५ कोटींचा गल्ला केला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात तब्बल २०.६७ कोटींची कमाई केली. लवकरच हा चित्रपट ५० कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

प्रवेश निकाल उच्च न्यायालयात; वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत सरकारविरोधात याचिका