मनोरंजन

'वेड' चित्रपटाने रचला गिनीज रेकॉर्ड!

नवशक्ती Web Desk

'वेड' या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर यशस्वी घोडदौड केली होती. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता 'वेड' चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अनोखा विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली आहे.

सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला. वेड सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या अनोख्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. वेड सिनेमात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस साठी सुद्धा छत्रीची निवड करण्यात आली. रितेश देशमुख यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वास नेला.

''वेड सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत'' या शब्दात रितेश देशमुख यांनी भावना व्यक्त केली.

स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा २० ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत या वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.'

Maharashtra HSC 12th Result 2024 Live Updates: यंदाही मुलींची बाजी तर मुंबई विभागाचा सर्वाधिक कमी निकाल!

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास 'हा' संघ थेट फायनलमध्ये; आज ठरणार अंतिम फेरीचा पहिला मानकरी

नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात