मनोरंजन

'छावा'च्या निमित्ताने विक्की कौशलची 'घरोघरी मातीच्या चुली'च्या सेटवर हजेरी; जानकी-ऋषिकेशला दिला कानमंत्र!

जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्कीने खास टिप्स दिल्या. खेळ असो नाहीतर लढाई... हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्याने सुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या...

Krantee V. Kale

स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल.

विक्की कौशलच्या छावा सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने विक्कीने घरोघरी मातीच्या चुलीच्या सेटवर खास हजेरी लावली. सध्या मालिकेत श्री आणि सौ स्पर्धा अटीतटीची होतेय. जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्कीने खास टिप्स दिल्या. खेळ असो नाहीतर लढाई... हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्याने सुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते. आपल्या टीमला सोबत घेऊन लढायची असते आणि जगात नवरा बायको पेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या असा कानमंत्र देत विक्कीने जानकी-ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत छावा सिनेमा पहाण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

जानकी-ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे विक्कीसोबतचा शूटिंगचा दिवस कायम स्मरणात ठेवतील. सुरुवातीला विक्कीसोबत काम करण्याचं दडपण होतं. मात्र त्यांनी येताक्षणीच हे दडपण दूर केलं. खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम आहे. मालिकेतला सीन मराठीमध्ये असल्यामुळे त्यांनी शूटिंग सुरु होण्यापूर्वी संपूर्ण टीमशी संवाद साधला. मालिकांचं शूट नेमकं कसं होतं, उच्चार कसे असायला हवे अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मोमेण्ट होती अशी भावना रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी व्यक्त केली.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले