लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दिली गुड न्यूज! रश्मिका-विजय नव्या प्रोजेक्टमधून एकत्र; पहिलं पोस्टर आणि गाण्याची झलक रिलीज 
मनोरंजन

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दिली गुड न्यूज! रश्मिका-विजय नव्या प्रोजेक्टमधून एकत्र; पहिलं पोस्टर आणि गाण्याची झलक रिलीज

लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांत विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचा पहिला लूक आणि चित्रपटातील खास लग्नगीताची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.

Mayuri Gawade

लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांत विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचा पहिला लूक आणि चित्रपटातील खास लग्नगीताची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. नवविवाहित जोडप्यासाठी हा खास सन्मान असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

विजय-रश्मिकाने २६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे लग्नगाठ बांधली. हा विवाह तेलुगू आणि कोडाव या दोन परंपरांनुसार पार पडला. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. संध्याकाळी दोघांनी लग्नाचे फोटो शेअर केले.

आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र

खऱ्या आयुष्यात एकत्र आल्यानंतर आता विजय आणि रश्मिका ‘रणबाली’ या चित्रपटातून पुन्हा एकदा ऑनस्क्रीन जोडी म्हणून दिसणार आहेत. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’नंतर हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे.

‘मैत्री मूवी मेकर्स’ने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये विजय ‘रणबाली’च्या भूमिकेत पारंपरिक वेशात दिसतो, तर रश्मिका ‘जयम्मा’च्या भूमिकेत साडी आणि दागिन्यांत झळकते. दोघांचा वेगळा आणि दमदार लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांत रिलीज होणार आहे.

'ओ मेरे साजन' गाण्याची खास झलक

पोस्टरसह चित्रपटातील ‘ओ मेरे साजन’ या गाण्याची १ मिनिट २० सेकंदांची झलकही रिलीज करण्यात आली. या व्हिडिओमध्ये रणबाली आणि जयम्माच्या हळदी-मेहेंदी सोहळ्याची तयारी, विवाह आणि नव्या घरी झालेलं स्वागत दाखवण्यात आलं आहे. सुरुवातीला थोडे संकोचलेले दिसणारे हे दोघे शेवटी गोड आणि सुंदर नात्यात रमलेले पाहायला मिळतात.

लग्नानंतर लगेचच चित्रपटाची झलक समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. खऱ्या आयुष्यातील जोडी आता पडद्यावरही किती कमाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा

Navi Mumbai : दोन दिवस जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी; जाणून घ्या पर्यायी मार्ग