कुर्यात सदा मंगलम! वाढदिवशीच विशाल निकमने बांधली अक्षया हिंदळकरसह लग्नगाठ  
मनोरंजन

कुर्यात सदा मंगलम! वाढदिवशीच विशाल निकमने बांधली अक्षया हिंदळकरसह लग्नगाठ

अखेर विशाल आपल्या वाढदिवसाच्या खास दिवशीच अक्षयासह लग्नबंधनात अडकला आहे. आपल्या वाढदिवशी, विशालने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत लिहिलं, "आज १० फेब्रुवारी...

Mayuri Gawade

मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाईचं वातावरण आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं कलाकार जोडपं म्हणजेच 'बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा विजेता, अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांच्या लग्नाची चर्चाही जोरदार सुरू आहे. मेहंदीपासून साखरपुड्यापर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी, चाहते प्रत्येक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. आता, अखेर विशाल आपल्या वाढदिवसाच्या खास दिवशीच अक्षयासह लग्नबंधनात अडकला आहे.

हळदीचा सोहळा ठरला चर्चेचा विषय

लग्नापूर्वी दोघांच्या घरी पारंपरिक विधींना सुरुवात झाली होती. त्यांचा हळदीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे खास क्षण विशालने सोशल मीडियावर शेअर केले होते. "आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…" असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केले होते.

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरच्या हळदीचे फोटो

हळदीसाठी विशालने पांढरा कुर्ता-पायजमा असा पारंपरिक पेहराव केला होता. तर अक्षयाने जांभळ्या रंगाची साडी नेसून सगळ्यांचे लक्ष वेधले. दोघेही हळदीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचं त्या फोटोंमध्ये पाहायला मिळालं. याआधी त्यांचा साखरपुडाही मोठ्या उत्साहात पार पडला होता.

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरच्यासाखरपुड्याचे फोटो

वाढदिवशी दिली लग्नाची गोड बातमी

विशालच्या लग्नाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. अनेक सेलिब्रिटी लग्नानंतर लगेच फोटो शेअर करतात. मात्र विशालने थोडा वेगळा मार्ग निवडला.

आपल्या वाढदिवशी, विशालने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत लिहिलं, "आज १० फेब्रुवारी २०२६, माझा वाढदिवस. सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. प्रवास आणि कार्यक्रमामुळे reply / call घेता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व… आजच्या या खास दिवशी महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखीने (अक्षया ) सात जन्मांची गाठ बांधली… लग्न सुफळ संपूर्ण पार पडलं. फोटो उद्या अपडेट करेन… हर हर महादेव."

या पोस्टमधून विशालने लग्न पार पडल्याची अधिकृत माहिती दिली. ११ फेब्रुवारीला तो लग्नाचे फोटो शेअर करणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र

विशाल आणि अक्षया यांनी स्टार प्रवाहवरील 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्या मालिकेतील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता तीच जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

विशाल आणि अक्षयाच्या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी चाहते आणि मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर

... म्हणून तक्रार करत नाही; पारंपरिक समाजात लैंगिक गुन्ह्यांविरोधात कुटुंब कचरतात - न्यायालय

"प्लिज मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवेन"; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादावर प्रणित मोरेची जाहीर माफी, VIDEO

विद्यार्थ्यांना मिळणार ST चे डिजिटल ‘रुपे’ कार्ड; सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना, विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रियेला गती

ठाण्यात अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल; ५८ शाळांची यादी जाहीर, दिवा परिसरात सर्वाधिक शाळा