मनोरंजन

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर आणि तिचा प्रियकर राहुल मोदी यांच्या वयात फरक किती?

Bollywood Love Story: श्रद्धा कपूरने बुधवारी पटकथा लेखक राहुल मोदीसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी करत एक स्लेफी पोस्ट केला आहे. या पोस्ट नंतर दोघांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय झाला आहे.

Tejashree Gaikwad

Shraddha Kapoor Boyfriend Rahul Mody Age: बुधवारी, १९ जून रोजी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने पटकथा लेखक राहुल मोदीसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी एक सेल्फी आणि कॅप्शन देत पोस्ट केली. दोघे गेल्या काही काळापासून डेट करत होते, मात्र आतापर्यंत त्यांनी आपले नाते लपवून ठेवले होते. आता अखेरीस तिने त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. श्रद्धाने बुधवारी पहाटे राहुलसोबत एक सेल्फी पोस्ट केला आणि लिहिले, "दिल रख ले, नेंद तो वापिस दे यार." हा फोटो आणि कॅप्शन पोस्ट करून श्रद्धाने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

फोटो झाला तुफान व्हायरल

काही वेळातच,हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. अभिनेत्रींच्या या आनंदाच्या बातमीवर तिच्या चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला. तिच्यावर भरपूर्ण प्रेमाचा वर्षाव झाला. श्रद्धाने पहिल्यांदाच राहुलसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

कोण आहे राहुल मोदी?

राहुल मोदी हा बी-टाऊनमधील प्रसिद्ध लेखक आहे. राहुलने चित्रपट निर्माता लव रंजन यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. प्यार का पंचनामा २, सोनू के टीटू की स्वीटी आणि तू झुठी में मक्का या सारख्या सिनेमाचे लेखन राहुलने केले आहे.

श्रद्धा आणि राहुल यांच्या वयात किती अंतर आहे?

उद्योगपती आमोद मोदी यांचा मुलगा राहुल मोदी ३४ वर्षाचा आहे. तर ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धाने नुकताच ३ मार्च रोजी तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. राहुल अभिनेत्री श्रद्धापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.

काही दिवसांपूर्वी, श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक सेल्फी शेअर केल्या होत्या. तेव्हा अभिनेत्रीने तिच्या गळ्यात सुरुवातीचे 'आर' या अक्षराचे पेंडंट घातलेले दिसून येते. या फोटो पोस्ट नंतर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आणि अखेरीस आज अभिनेत्रीने स्वतः नात्याची पुष्टी केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक