आंतरराष्ट्रीय

दक्षिण कोरियात विमान कोसळून १७९ ठार; दोघांना वाचवण्यात यश

दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर जेजू एअर कंपनीचे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

Swapnil S

मुआन : दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर जेजू एअर कंपनीचे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. या विमानात १७५ प्रवाशांसह ६ विमान कर्मचारी होते. मृतांमध्ये ८२ पुरुष व ८४ महिला आहेत.

रविवारी सकाळी भारतीय वेळेनुसार ५.३७ वाजता हा अपघात झाला. बँकॉकहून येणारे विमान विमानतळावर लँडिंग करणार होते. पण, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमानाची चाके उघडली नाहीत. आणीबाणीच्या काळात विमानाचे बेली लँडिंग केले जाते. यात विमान थेट धावपट्टीला टेकते. याचवेळी विमान धावपट्टीवरून घसरून विमानतळाच्या भिंतीला जाऊन धडकले. यामुळे विमानाचा स्फोट झाला.

या अपघातापूर्वी मुआन विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षातर्फे विमानाला पक्षी धडकल्याचा ॲॅलर्ट पाठवण्यात आला होता. विमानाचा लँडिंग गिअर खराब होण्याचे हे एक कारण असू शकते.

बोईंग कंपनीच्या ‘७३७-८००’ या विमानाने विमानतळावर लँडिंग करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पहिल्यांदा लँडिंग गिअर न उघडल्याने हे विमान लँडिंग करू शकले नाही. त्यानंतर या विमानाने विमानतळाला एक फेरी मारली. त्यानंतर वैमानिकाने लँडिंग गिअरशिवाय बेली लँडिंग पद्धतीने विमानाचे लँडिंग करण्याचा प्रयत्न केला.

आग विझवायला ४३ मिनिटे लागली

मुआन विमानतळाच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाला लागलेली आग विझवायला ४३ मिनिटे लागली. विमानात १७३ दक्षिण कोरियन, दोन थायलंडचे नागरिक होते. यापैकी ११ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.या अपघाताप्रकरणी जेजू एअरचे सीईओ किम ई-बे यांनी माफी मागितली आहे. या अपघाताची सर्व जबाबदारी मी घेतो, असे त्यांनी सांगितले.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती