आंतरराष्ट्रीय

गाझा शहरात ७ इस्त्रायली जवानांचा मृत्यू

नवशक्ती Web Desk

राफा: गाझा शहरात दबा धरुन बसलेल्या हमास अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सात इस्त्रायली जवान दगावले असल्याची माहिती इस्त्रायली माध्यमांनी दिली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा मधील नागरिकांना इजा होउ देवू नका असे वारंवार इस्त्रायलला सांगितले आहे. तसेच पॅलेस्टाइन नागरिकांसाठी मदत सामुग्री देखील पाठवली आहे. इस्त्रायलने मात्र अमेरिकेच्या सूचना धुडकावून लावल्या आहेत. अमेरिकेने युद्धपश्चात शांती स्थापनेचा प्रस्ताव इस्त्रायलसमोर ठेवला होता. इस्त्रायलने केलेल्या हवार्इ आणि जमीनीवरील हल्ल्यात आतापर्यंत १८४०० पॅलेस्टार्इन नागरिक दगावले आहेत. गाझा मधील २३ लाख लोकसंख्येपैकी ८५ टक्के नागरिकांना घरदार सोडावे लागले आहे. सहा आठवड्यांपासून हे युद्ध सुरु आहे.

 युद्ध सुरु झाल्यानंतर इस्त्रायलने गाझातील नागरिकांना उत्तरेकडे जाण्यास सांगितले होते. आता उत्तर गाझा देखील इस्त्रायली हल्ल्यांचे भक्ष्य झाला आहे. तेथील आरोग्यसेवा, मानवतावादी सेवा ठप्प झाल्या आहेत. पावसामुळे तंबू देखील राहाण्या लायक राहिले नाहीत. यामुळे पॅलेस्टार्इनच्या नागरिकांचे हाल होत आहेत.

इस्त्रायल पाठिंबा गमावत आहे -बायडेन

इस्त्रायल आता आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा गमावत असल्याचा इशारा बायडेन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतन्याहू यांना दिला आहे. स्वैर बॉम्बफेकीत नागरिक नाहक मारले जात आहेत. नेतन्याहूंच्या पक्षात कट्टर उजव्यांचा भरणा अधिक असून आता सरकार बदलले पाहिजे असे मत बायडेन यांनी व्यक्त केले आहे. मात्र ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात १२०० इस्त्रायली नागरीक मारले गेले होते आणि २४० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते हे विसरायला इस्त्रायल तयार नाही.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस