एअर इंडियाच्या विमानाचे फुकेतमध्ये हार्ड लँडिंग; रनवेवर विमान आदळून पुढील चाकही तुटले; सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप 
आंतरराष्ट्रीय

एअर इंडियाच्या विमानाचे फुकेतमध्ये हार्ड लँडिंग; रनवेवर विमान आदळून पुढील चाकही तुटले; सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

हैदराबादहून फुकेतच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचं बुधवारी दुपारच्या सुमारास फुकेत येथे 'हार्ड लँडिंग' करणयात आलं. विमान धावपट्टीवर उतरताच त्याचा नोज गिअर तुटला आणि विमानाचं पुढचं चाकही तुटलं. सदर घटनेनंतर विमानतळावरील रन वे काही काळासाठी बंद ठेवण्यात आला.

Swapnil S

फुकेत : हैदराबादहून फुकेतच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचं बुधवारी दुपारच्या सुमारास फुकेत येथे 'हार्ड लँडिंग' करणयात आलं. विमान धावपट्टीवर उतरताच त्याचा नोज गिअर तुटला आणि विमानाचं पुढचं चाकही तुटलं. सदर घटनेनंतर विमानतळावरील रन वे काही काळासाठी बंद ठेवण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार विमानातील १३३ प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे.

हार्ड लँडिंगनंतर नेमकं काय घडलं?

एअर इंडियाचं ७३७ एमएएक्स ८ हे विमान बुधवारी दुपारी फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालं, मात्र अगदी अनपेक्षित आणि हादरवणाऱ्या पद्धतीनं झालेल्या या लँडिंगनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे लँडिंग अतिशय भीषण स्वरुपाचं होतं. ज्यामध्ये विमानाचं नोज व्हील अर्थात पुढील चाकच तुटलं आणि लँडिंग गिअरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

ही अपघातवजा घटना इतक्या गंभीर स्वरुपातील होती की तातडीनं विमानतळावरील ही धावपट्टी उड्डाणांसाठी बंद करण्यात आली. ज्यामुळं काही उड्डाणांवर याचा परिणामही झाल्यानं फुकेतमधील विमानसेवा कोलमडली. अपघातानंतर विमानातील सर्व 133 प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं ज्यानंतरही हे विमान विमानतळावरच उभं करण्यात आलं.

घटनेचा तपास होणार?

सर्व प्रवाशांना तातडीनं विमानाबाहेर काढल्यानंतर एअर इंडिया एक्स्प्रेसच्याच माहितीनुसार विमानातील क्रू नं लगेचच आपात्कालीन उपाययोजना अवलंबल्या. सदर प्रकरणी DGCA सुद्धा चौकशी करण्याची शक्यता असून, भारतीय विमानसेवा कंपनीचं हे विमान असल्यानं या घटनेची चौकशी होऊ शकते असा अंदा ज आहे. बोईंग 737 MAX 8 जगभरात चर्चेचा विषय ठरत असतानाच ही घटना घडल्यामुळं आता या चर्चांना वेगळं वळण मिळताना दिसत आहे.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया