ANI
आंतरराष्ट्रीय

अजित डोवल यांची अमेरिकेच्या जॅक सुलेवॉन यांच्याशी चर्चा

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलेवान यांच्याशी चर्चा केली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलेवान यांच्याशी चर्चा केली.

सुलेवान हे १७ व १८ जून दरम्यान भारत दौऱ्यावर आले आहेत. मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेच्या ज्यो बायडेन प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्याचा हा भारताचा पहिलाच दौरा आहे.

या भेटीत डोवल व सुलेवान यांनी भारत आणि अमेरिकेतील महत्वपूर्ण तंत्रज्ञान, द्विपक्षीय संरक्षण संबंध, क्षेत्रीय सुरक्षितता आदींवर चर्चा केली. या दोघांनी भारत-मध्य पूर्व-युरोप मार्गिकेबाबत विचार केला.

सुलेवान यांच्यासोबत अमेरिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ व उद्योगपती यांचे शिष्टमंडळ आले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री