आंतरराष्ट्रीय

नवाझ शरिफ-बिलावल भुट्टो यांच्यात युती, शाहबाज शरीफ होणार पाकचे नवे पंतप्रधान?

पाकिस्तानात कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला बहुमताचा १३३ आकडा गाठता न आल्यामुळे नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन व बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) हे पक्ष

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानात कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला बहुमताचा १३३ आकडा गाठता न आल्यामुळे नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन व बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) हे पक्ष युतीचे सरकार स्थापन करणार आहेत. या युतीकडून पंतप्रधान पदासाठी माजी पंतप्रधान शाहबाज शरिफ यांच्या नावाची घोषणा केली आहे.

नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पीएमएल-एन पक्षाने आश्चर्यकारकरित्या नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांची पंतप्रधापदासाठी निवड केली आहे. यामुळे इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सर्वेसर्वा तथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांनी पाठिंबा दिलेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत विजयी कामगिरी केली. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्या पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही.

इम्रान खान यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले होते. त्यामुळे पीटीआय पक्षाच्ये उमेदवारांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढावी लागली.

असे आहे पक्षनिहाय बलाबल

८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीने एकूण ५३ जागांवर तर पीएमएल-एन पक्षाने ७५ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान या पक्षाचा १७ जागांवर विजय झाला आहे. बहुमताचा आकडा पार करण्यासाठी २६५ पैकी १३३ लोकप्रतिनिधींचे समर्थन मिळणे गरजेचे आहे. पीटीआय पक्षाचे समर्थन लाभलेल्या एकूण १०१ अपक्ष उमेदवारांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

मीरा-भाईंंदर महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; महापौरपद डिंपल मेहता, तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील

Mira-Bhayandar : सोसायटीच्या ऑडिटसाठी मागितली लाज; सनदी लेखापाल ACB च्या जाळ्यात