हसीनांच्या घरवापसीसाठी बांगलादेश प्रयत्नशील; गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांची माहिती  
आंतरराष्ट्रीय

हसीनांच्या घरवापसीसाठी बांगलादेश प्रयत्नशील; गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांची माहिती

माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ‘कायदेशीर प्रक्रियेद्वारे’ परत आणू इच्छित आहे, अशी माहिती बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी दिली.

Swapnil S

ढाका/नवी दिल्ली : माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ‘कायदेशीर प्रक्रियेद्वारे’ परत आणू इच्छित आहे, अशी माहिती बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी दिली.

मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली असतानाही आपण ‘खूप लवकर’ मायदेशी परतू अशी आशा हसीना यांनी अलीकडेच व्यक्त केली होती, त्यावर गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या अहमद यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘आम्हाला त्यांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत आणायचे आहे.’ तसेच, जर हसीना यांना परत यायचे असेल, तर त्यांच्या वापसीमध्ये कोणताही कायदेशीर अडथळा असल्याचे आपल्याला माहित नाही, असेही ते म्हणाले.

ऑगस्ट २०२४ मध्ये आंदोलनानंतर त्यांचे अवामी लीग सरकार कोसळल्यापासून हसीना भारतात राहत आहेत. त्यानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनाने एका कार्यकारी आदेशाद्वारे अवामी लीगवर बंदी घातली आणि बांगलादेशच्या पुनर्रचित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात हसीना यांच्याविरुद्ध खटला सुरू केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये या न्यायाधिकरणाने हसीना यांच्या अनुपस्थितीत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावणी होती.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा