आंतरराष्ट्रीय

ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांना २०२६ चा बुकर पुरस्कार

ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांना ‘दी एण्ड ऑफ एव्हरीथिंग’ या कादंबरीसाठी २०२६ चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या ८१व्या वर्षी हा पुरस्कार मिळवून त्यांनी बुकर पुरस्काराच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Swapnil S

लंडन : ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांना ‘दी एण्ड ऑफ एव्हरीथिंग’ या कादंबरीसाठी २०२६ चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या ८१व्या वर्षी हा पुरस्कार मिळवून त्यांनी बुकर पुरस्काराच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पुरस्काराचे ते आजवरचे सर्वात वयोवृद्ध विजेते ठरले आहेत. हॅरिसन यांना त्यांच्या 'द एंड ऑफ एव्हरीथिंग' या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला.

लंडन येथे सोमवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासोबत त्यांना ५० हजार पौंड (अंदाजे ६७ हजार अमेरिकी डॉलर) इतकी रक्कम मिळणार आहे.

'द एंड ऑफ एव्हरीथिंग' ही विज्ञानकथा आणि डिस्टोपियन अर्थात विनाशानंतरच्या जगाचे चित्रण करणारी कादंबरी आहे. या कादंबरीची कथा इंग्लंडमधील केंट किनारपट्टीवरील विनाशानंतरच्या परिस्थितीवर आधारित आहे. फिलिप टेनेन्ट नावाचा तरुण आपल्या वृद्ध मावशीसोबत राहतो. समुद्रकिनाऱ्यावर वस्तू शोधून तो उदरनिर्वाह करतो. एके दिवशी त्याला आकार बदलू शकणारी एक रहस्यमय वस्तू सापडते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडू लागतात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

कोकण किनाऱ्यांचा जागतिक गौरव; गुहागर, लाडघर, श्रीवर्धन समुद्रतटांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार