आंतरराष्ट्रीय

पगारी 'लेक' हवी! चीनमध्ये वृद्ध महिलेची नोकरीसाठी भावनिक ऑफर; एक फ्लॅटसह देणार 'इतका' पगार

वृद्धाना सांभाळणं हे देखील एक जोखीमीचं त्यासोबतच भावनिक काम आहे. कारण या वयात त्यांच्या भावना, वेदना समजून घेणारी व्यक्ती हवी असते. जी केअर टेकर होऊ शकत नाही. त्यासाठी चीनमधील हेनान प्रांतातील ७८ वर्षीय मा (Ma) नावाच्या वृद्ध महिलेने सोशल मीडियावर वेगळीच ‘नोकरीची जाहिरात’ दिली आहे.

नेहा जाधव - तांबे

सध्याच्या जगात एकत्र कुटुंब पद्धत जाऊन विभक्त कुटुंब पद्धत आली आहे. आई-वडिलांना वृद्धापकाळात सांभाळणारी मुलं आता 'प्रायव्हसी' म्हणून वेगळं आयुष्य जगू लागली आहेत. अशा वेळी काहीजण वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी केअर टेकर पण ठेवतात. मात्र, काहीजण त्यांची मायेने ते काळजी घेऊ शकत नाहीत. अनेकदा केअरटेकर कडून मारहाण, तब्येतीकडे दुर्लक्ष अशा घटनाही घडतात.

वृद्धाना सांभाळणं हे देखील एक जोखीमीचं त्यासोबतच भावनिक काम आहे. कारण या वयात त्यांच्या भावना, वेदना समजून घेणारी व्यक्ती हवी असते. जी केअर टेकर होऊ शकत नाही. त्यासाठी चीनमधील हेनान प्रांतातील ७८ वर्षीय मा (Ma) नावाच्या वृद्ध महिलेने सोशल मीडियावर वेगळीच ‘नोकरीची जाहिरात’ दिली आहे. या जाहिरातीत तिने थेट "माझ्या घरी मुलगी म्हणून राहा… माझी काळजी घ्या… मी बदल्यात तुम्हाला फ्लॅट, पगार आणि माझी सर्व मालमत्ता देईन" अशी ऑफर दिली आहे.

का शोधतेय 'पगारी मुलगी'?

मा यांना दोन मुली आहेत. पण परिस्थिती अशी, की दोघींपैकी कोणीच आईचा आधार होऊ शकत नाही. कारण त्यांच्या मोठ्या मुलीसोबत नातवाच्या संगोपनावरून वाद झाले असून मतभेद वाढले आहेत. तसेच, मुलीनेही संपर्क तोडला आहेत. तर, तिची धाकटी मुलगी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने ती स्वतःचीही काळजी घेऊ शकत नाही.

मा स्वतः दम्याच्या आजाराने त्रस्त आहे. इतकं की घराबाहेर १०० मीटर देखील चालणं तिला कठीण जातं. दैनंदिन कामं, औषधोपचार, रुग्णालयात जाणं… सर्व काही अवघड झालं आहे. घरात आधार देणारे कोणीच नसल्याने ती पूर्णपणे एकटी पडली आहे.

ऑफर ऐकूनच आश्चर्य वाटेल

माकडे दोन फ्लॅट, जवळपास ५० लाख रुपयांची बचत, सोने-नाणी आणि ३,००० युआन म्हणजे सुमारे ३७ हजार रुपये मासिक पेन्शन आहे. तिने ऑफर दिली आहे की एका फ्लॅटचा मालकी हक्क, मासिक ३७ हजारांचा पगार, सोने-नाणे व इतर वैयक्तिक मालमत्ता, त्यांच्या आयुष्यभराची पूर्ण जबाबदारी देण्यात येईल.

या बदल्यात मागणी काय?

या बदल्यात त्यांना हवी एक दयाळू महिला जी त्यांच्या सोबत राहील, दैनंदिन कामात मदत करेल, डॉक्टरांच्या भेटींसाठी साथ देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीप्रमाणे प्रेम देईल.

चीनमध्ये वाढत चाललाय एकटेपणा

चीनमध्ये ही घटना वेगळी नाही. कारण चीनमध्ये वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०२१ च्या सर्वेक्षणानुसार ६० वर्षांवरील ६०% वृद्ध एकटे राहतात. कुटुंब शहरात, विदेशात किंवा वेगळ्या प्रांतात गेल्यामुळे वृद्धांना भावनिक आधार मिळत नाही. यामुळे चीनमध्ये ‘सरोगेट मुलगा/मुलगी’ किंवा ‘भावनिक केअरटेकर’ हा उद्योग तयार झाला आहे. एका भेटीचे शुल्क ५००–२५०० युआन (सुमारे ७००० ते ३५००० भारतीय रुपये) इतके घेतले जाते.

आर्थिक साधनं असली तरी भावनिक आधार, काळजी यांच्या कमतरतेने वृद्धांचे आयुष्य उदास व एकाकी बनत आहे. ज्या समाजात कुटुंब हाच सर्वात मोठा आधार मानला जातो, तिथे एखाद्या महिलेने पैसे देऊन ‘मुलगी’ शोधण्याची वेळ येणं ही वेदनादायक बाब आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड