आंतरराष्ट्रीय

वातावरणीय बदलाने आजारांचा धोका वाढणार; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल

वातावरणीय बदलामुळे गेल्या काही वर्षांत कधी उन तर कधी पाऊस यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

वातावरणीय बदलामुळे गेल्या काही वर्षांत कधी उन तर कधी पाऊस यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०३०-५० दरम्यान वर्षांला अडीच लाख मृत्यू होण्याचा धोका वर्तवला आहे. तर राज्यातील दुष्काळाच्या प्रमाणात सहा पटीने वाढ होणार असून पूर स्थितीचा धोका अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. वातावरणीय बदलामुळे राज्यात आजारांचा प्रादुर्भाव वाढवण्याचा धोका लक्षात घेता त्याचा संशोधन करण्यासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती करण्यात आली आहे.

वातावरणीय बदलामुळे हवेची गुणवत्ता खालावत असून आजाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर वातावरणीय बदलामुळे लोकांच्या आरोग्यासह जीवाला धोका वाढला आहे. जागतिक हवामान बदलाबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सन २०३० ते सन २०५० या दरम्यान होणाऱ्या वातावरणीय बदलामुळे दरवर्षी २.५० लक्ष अधिकचे मृत्यू होण्याचा धोका वर्तवला आहे. तसेच राज्यात दुष्काळाचे प्रमाण सहा पटीने व पूर परिस्थितीची तीव्रतेत वाढ होण्याचा धोका वर्तवला आहे. वातावरणीय बदलाचा मुंबईसह राज्यात होणारा परिणाम लक्षात घेता हवा, पिण्याचे पाणी व भूमिगत पाण्याची गुणवत्ता आदींचा अभ्यास करून वातावरण बदलामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आजारांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्यासाठी सखोल संशोधन करणे गरजेचे आहे. या प्रणालीचा वापर केल्यास वातावरण बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल तसेच संशोधन राज्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व दिर्घकालीन उपयोजनात्मक स्वरुपाचे असल्याचे व याद्वारे भविष्यकाळात उद्भवणाऱ्या आजारांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल, असे आयआयटी मुंबईच्या संशोधन नमूद केले आहे.

आयआयटी करणार आजारांचे संशोधन

वातावरणीय बदलामुळे राज्यात विविध आजारांचा धोका अधिक वाढण्याचा धोका वाढला आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या आजाराचे संशोधन करण्यासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आयआयटी मुंबईला २ कोटी २४ लाख ८६ हजार रुपये राज्य सरकार मोजणार आहे.

-वर्षांला अडीच लाखांहून अधिक मृत्यू

-दुष्काळाच्या प्रमाणात सहा पटीने वाढ

-पूरस्थितीचा धोका अधिक

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

जुलै महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश