आंतरराष्ट्रीय

सौदी अरेबियात उष्णतेचा कहर, १ हजारांपेक्षा जास्त हज यात्रेकरूंचा मृत्यू? अनेक भारतीयांनी गमावला जीव

Suraj Sakunde

जगभरातील अनेक देशांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियात कडक उन्हामुळे हज यात्रेला गेलेल्या १,००० हून अधिक यात्रेकरुंचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे. या मृतांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश आहे. या आठवड्यात मक्कामधील तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्याचा फटका हज यात्रेकरूंना बसला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

९० भारतीयांच्या मृत्यू?

जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज करण्यासाठी मक्केला पोहोचतात. या वर्षी सुमारे १८ लाख लोक हज यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. यंदा भारतातून सुमारे दोन लाख लोकांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली होती. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. मक्का येथे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. याशिवाय अनेक यात्रेकरू बेपत्ता असून त्यांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. दरम्यान बेपत्ता हज यात्रेकरूंचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.

मक्क्याचं तापमान वाढतंय...

हज हा इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभांपैकी एक मानला जातो. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमानं आयुष्यात एकदा हज यात्रा करावी, असं मानलं जातं. अलीकडच्या काळात वातावरणातील बदलामुळे हज यात्रेवर गंभीर परिणाम होत आहे. हज क्षेत्राचं तापमान दर दशकात ०.४ अंश सेल्सिअसनं वाढत असल्याचं सौदी अरेबियाच्या एका संशोधनात म्हटलं आहे. सोमवारी मक्काच्या ग्रँड मशिदीजवळचे तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचलं, असं सौदीच्या हवामान खात्यानं सांगितले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था