दिल्ली स्फोटात पाक लष्कराचा हात; पाकिस्तानी पत्रकाराच्या वक्तव्याने खळबळ 
आंतरराष्ट्रीय

दिल्ली स्फोटात पाक लष्कराचा हात; पाकिस्तानी पत्रकाराच्या वक्तव्याने खळबळ

दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तानच्या लष्कराची मोठी भूमिका आहे, आपल्या परराष्ट्र धोरणासाठी पाकिस्तान दहशतवादाचा एक हत्यार म्हणून वापर करीत आहे, असा आरोप पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते ताहा सिद्दीकी यांनी ‘एक्स’वर केल्याने खळबळ माजली आहे.

Swapnil S

इस्लामाबाद : दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तानच्या लष्कराची मोठी भूमिका आहे, आपल्या परराष्ट्र धोरणासाठी पाकिस्तान दहशतवादाचा एक हत्यार म्हणून वापर करीत आहे, असा आरोप पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते ताहा सिद्दीकी यांनी ‘एक्स’वर केल्याने खळबळ माजली आहे.

ताहा सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'पाकिस्तानी लष्कर हे भारत आणि इतर देशात दहशतवाद निर्यात करते. त्यांची ही जुनी पद्धत आहे. त्याद्वारे ते आपले राजनैतिक हित साधण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानात अस्तित्वात असलेले लष्करी शासन दहशतवादाला खतपाणी घालून फक्त क्षेत्रीय शांती धोक्यात आणत नाही तर देशाच्या लोकशाही संस्थांनाही खिळखिळी करत आहे.

‘जैश’चे कनेक्शन

सिद्दीकी यांच्या या वक्तव्यानंतर फक्त पाकिस्तानातच नाही तर आंततराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटाने संपूर्ण देश हादरला असताना पाकिस्तानी पत्रकारांनी हा दावा केला आहे. दिल्ली स्फोटाशी पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन समोर येत आहे. दिल्लीप्रमाणेच पाकिस्तानातील इस्लामाबादमध्येही अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटाचा तपास अजून सुरू आहे.

फ्रान्समध्ये निर्वासित

ताहा सिद्दीकी यांनी पाकिस्तानी लष्करावर यापूर्वीही गंभीर आरोप केले आहेत. ते अनेक दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराच्या धोरण आणि प्रेस फ्रीडमवर प्रभाव टाकण्यावरून टीका करत आले आहेत. त्यांनी पाकिस्तानी लष्कर माध्यमांवर फक्त नियंत्रण ठेवत नाही तर जे पत्रकार त्यांच्याविरूद्ध बोलतील त्या पत्रकारांनाही लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. २०१८ मध्ये सिद्दीकी यांचा कराची एअरपोर्टवरून अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये निर्वासित म्हणून राहणे पसंत केले.

अधिकृत प्रतिक्रिया नाही

सिद्दीकी यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे पाकिस्तानी पत्रकार समूहातही एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काही पत्रकारांनी सिद्दीकी यांचे समर्थन केले आहे. त्यांच्या आरोपांना गांभिर्याने घेतले पाहिजे, असे काही जण म्हणत आहेत, तर काही जण याला राजकीय वक्तव्य म्हणत आहेत. पाकिस्तानी सरकारकडून अजून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश

आता सुनावणी पुढच्या वर्षी; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत २१ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

पार्थ पवारांसह अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा! अंजली दमानिया यांची मागणी