संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प आज घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२० जानेवारी) शपथ घेणार आहेत.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२० जानेवारी) शपथ घेणार आहेत. भारताकडून या शपथविधी सोहळ्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे उपस्थित राहणार आहेत.

ट्रम्प यांनी २०१६ ते २०२० दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे. या शपथविधी सोहळ्याला विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग एमहॉफ उपस्थित राहतील. इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी, एल साल्वादोरचे राष्ट्रपती नायब बुकेले, हंगेरीहून विक्टर ऑर्बन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर माइली उपस्थित राहतील.

ट्रम्प यांच्यासोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी शपथविधी सोहळ्याला उद्योगपतींनी मोठ्या देणग्या दिल्या आहेत. या सोहळ्यासाठी १,५०० कोटी रुपये जमले आहेत.

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!