PM
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानात १७ डिसेंबरला निवडणुकांची घोषणा

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानात पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून येत्या १७ डिसेंबरला जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच या घोषणेनंतर दुसऱ्या दिवसापासून नामनिर्देशनपत्रे सादर केली जातील, असे जिओ न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.

वृत्तात म्हटले आहे की, ८ फेब्रुवारी रोजी प्रांतीय आणि राष्ट्रीय विधानसभांसाठी मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक निरीक्षकाला ५४ दिवस लागतील.  देशात मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि घोषित तारखेनुसार निवडणुका घेण्यास काही शंका नाही. पाकिस्तान निवडणूक आयोग १४२ जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी आणि ८५९ निर्वाचन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. तसेच देशभरातील उपायुक्तांच्या बदल्या आणि नियुक्तीवर बंदी घालण्यात आली आहे, असेही आयोगाच्या सूत्रांचा हवाला देत जिओ न्यूजने वृत्त दिले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस