फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट; दोन्हीकडे 'रेड अलर्ट' जारी, ४० जणांचा मृत्यू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
आंतरराष्ट्रीय

फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट; दोन्हीकडे 'रेड अलर्ट' जारी, ४० जणांचा मृत्यू

फ्रान्समध्ये भीषण उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, तापमानाचे सर्व जुने विक्रम मोडीत निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Swapnil S

पॅरिस : फ्रान्समध्ये भीषण उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, तापमानाचे सर्व जुने विक्रम मोडीत निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी फ्रान्समधील लाखो लोक घामाघूम अवस्थेत जागे झाले. देशाच्या निम्म्या भागात, म्हणजेच ५४ विभागांमध्ये हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

४० जणांचा बुडून मृत्यू उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक नद्या आणि तलावांकडे धाव घेत आहेत. मात्र, गेल्या पाच दिवसांत फ्रान्समध्ये ४० जणांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यात प्रामुख्याने तरुणांचा समावेश आहे, अशी माहिती फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्न्यू यांनी दिली.

ब्रिटनमध्येही 'रेड' अलर्ट इंग्लिश खाडीपलीकडे ब्रिटनमध्येही उष्णतेचा पारा चढला आहे. हवामान विभागाने बुधवार आणि गुरुवारसाठी 'रेड एक्सट्रीम हीट' इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, जून महिन्यातील तापमानाचे सर्व विक्रम मोडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान बदलाचा फटका युरोपियन युनियनच्या 'कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस'च्या अहवालानुसार, १९८० पासून युरोपचे तापमान जागतिक सरासरीच्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, गेल्या चार वर्षांत युरोपमध्ये उष्णतेमुळे झालेल्या २ लाखांहून अधिक मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू टाळण्यासारखे होते. हवामान बदलामुळे उष्णतेची तीव्रता आणि वारंवारता वाढत असून, त्याचा मोठा फटका दक्षिण-पूर्व युरोपला बसत आहे.

परिस्थिती गंभीर

  • असह्य उष्णता: दिवसभर तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. रात्रीही उष्णतेपासून दिलासा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

  • पायाभूत सुविधांवर परिणाम: फ्रान्समध्ये वातानुकूलित यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणावर नसल्याने शाळा, रेल्वे सेवा आणि क्रीडा स्पर्धांवर मोठा परिणाम झाला आहे.

  • २००३ च्या भीषण आठवणी: ही उष्णतेची लाट २००३ च्या भीषण लाटेची आठवण करून देत आहे, ज्यामध्ये सुमारे १५,००० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच फ्रान्सने 'हीट वॉच' प्रणाली सुरू केली होती.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं