संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

ग्रीनलँडवरील टॅरिफ धमकी; ट्रम्प यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

ग्रीनलँडबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ जाहीर केले. यामुळे युरोपियन देश बिथरले असून ट्रम्प यांच्या विश्वासर्हतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गेल्या वर्षी युरोपियन संघातील देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावणार नाही, असा करार ट्रम्प यांनी मान्य केला होता. आता ट्रम्प यांनी त्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Swapnil S

डावोस: ग्रीनलँडबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ जाहीर केले. यामुळे युरोपियन देश बिथरले असून ट्रम्प यांच्या विश्वासर्हतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गेल्या वर्षी युरोपियन संघातील देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावणार नाही, असा करार ट्रम्प यांनी मान्य केला होता. आता ट्रम्प यांनी त्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेअर लेयेन यांनी ट्रम्प यांच्या त्या घोषणेला प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांनी फेब्रुवारीपासून डेन्मार्कच्या अर्धस्वायत्त प्रदेश ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा मिळवण्यासाठी दबाव वाढवताना डेन्मार्कच्या बाजूने उभ्या राहिलेल्या आठ युरोपीय देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली आहे.

‘युरोपियन संघ आणि अमेरिकेने गेल्या जुलैमध्ये व्यापार करार केला आहे,” असे व्हॉन डेअर लेयेन यांनी स्वित्झर्लंडमधील डावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सांगितले. ‘राजकारणात जसे व्यवसायात, तसंच — करार म्हणजे करार. मित्र एकमेकांशी हस्तांदोलन करतात, तेव्हा त्याला अर्थ असायलाच हवा.’ आम्ही अमेरिकेतील जनतेकडे केवळ सहयोगी म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून पाहतो.

ट्रम्प यांनी मात्र चीन आणि रशियाकडून संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला सुरक्षेच्या कारणास्तव ग्रीनलँडची आवश्यकता असल्याचा आग्रह धरला आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या धमक्यांमुळे युरोपभर संतापाची लाट उसळली असून, प्रतिशोधात्मक टॅरिफसह संभाव्य उपाययोजनांवर विचार सुरू झाला आहे. यामध्ये युरोपियन संघाच्या ‘अँटी-कोअर्सन इन्स्ट्रुमेंट’चा म्हणजेच अनौपचारिक भाषेत ‘ट्रेड बझुका’ पहिल्यांदाच वापर करण्याचाही विचार केला जात आहे.

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी

तपासणीच्या बहाण्याने विमानतळ कर्मचाऱ्याचे कोरियन महिलेसोबत अश्लील कृत्य; पुरुषांच्या वॉशरूमजवळ घेऊन गेला अन्...