आंतरराष्ट्रीय

आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणारे असानी चक्रीवादळाची दिशा बदलली

वृत्तसंस्था

प. बंगालच्या उपसागरातातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले ‘असानी’ चक्रीवादळ आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार होते. या चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्याने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला भागाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. काकीनाडा आणि विशाखापटणम यांच्यात हे चक्रीवादळ नुकसान करू शकते, असा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेच्या दिशेने पुढे जात आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये ओदिशा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार वारे आणि पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ हळूहळू उत्तर पश्चिमेच्या दिशेने जात आहे. येत्या ३६ तासात हे चक्रीवादळ कमजोर पडेल. १२ मे रोजी सकाळपर्यंत त्याचा प्रभाव एकदम कमी होईल. किनारपट्टी भागावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

मंगळवारी दुपारी हे चक्रीवादळ काकिनाडापासून २१० किलोमीटर दूरवर दक्षिण-पूर्व दिशेले होते. विशाखापटणमपासून ते ३१० किलोमीटर तर गोपालपूर किनारपट्टीवर ५३० किलोमीटरवर होते. बुधवारपर्यंत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशला धडकेल, असे एका हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?