आंतरराष्ट्रीय

स्मार्ट फोनचा परिणाम शिक्षक विद्यार्थी संवादावर ; युनेस्कोच्या अहवालातून धक्कादायक माहित समोर

शाळांमधून स्मार्ट फोन हद्दपार करण्याचा सल्ला युनेस्कोने नव्या अहवालातून जगभरातल्या देशांना दिला आहे

नवशक्ती Web Desk

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांचं भविष्य घडत आहे. डिजिटल प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडत आहे. मात्र, युनोस्कोने याचा विपरित परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादावर होत असल्याचं मत युनेस्कोने नोंदवलं आहे. त्यामुळे शाळांमधून स्मार्ट फोन हद्दपार करण्याचा सल्ला युनेस्कोने नव्या अहवालातून जगभरातल्या देशांना दिला आहे. युनेस्कोने 'ग्लोबल एज्युकेशन मॉनिटिरग रिपोर्ट' या अहवालातून लहाव वयापासून मुलांकडुन स्मार्ट फोनचा होत असलेल्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे.

डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाची जागा ते घेऊ शकत नाही, असं मत संयुक्त राष्ट्रांती संस्था असलेल्या युनेस्कोने व्यक्त केलं आहे. यावेळी शिक्षण हे मानव केंद्रीत असायला हवं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्याक घटक म्हणून पाहायला हवं. स्मार्टफोन किंवा मोबाईलच्या अतिवापराचे थेट परिणाम शैक्षणिक कामगिरीवर होत असल्याने शैक्षणिक कामगिरीवर खालवल्याचही युनेस्कोने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

युनेस्कोने केलेल्या सुचनांचे अनेक देशातून स्वागत होताना दिसत नाही. शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण तंज्ज्ञांनी स्वागत केलं आहे. स्मार्टफोन किंवा डिजिटल एज्युकेशन आणि विद्यार्थी शिक्षक संवाद यातून सुवर्ण मध्य काढला पाहिजे, असंही मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत