ANI
ANI
आंतरराष्ट्रीय

भारताचा मित्र हरपला

वृत्तसंस्था

जपानची सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेच्या वृत्तानुसार, रविवारी होणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे यांची एक सभा पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावरील या सभेमध्ये आबे यांचे भाषण सुरू असतानाच त्यांच्यावर तेत्सुया यामागामी या ४१ वर्षीय माजी सैनिकाने पाठीमागून गोळीबार केला. दीडशे मीटर अंतरावरून त्याने गोळ्या झाडल्या. प्लास्टिक पिशवीत त्याने बंदूक गुंडाळून आणली होती. विशेष म्हणजे त्याने स्वतःच ती बंदूक बनवली होती. पत्रकार म्हणून तो या सभेत सहभागी झाला होता. पोलिसांनी घटनास्थळीच यामागामी याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. आबे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतरही हल्लेखोर तेत्सुया यामागामी तिथेच थांबून राहिला होता. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. तेत्सुया यामागामी हा मेरिटाइम सेल्फ डिफेंन्स फोर्समधील सदस्य म्हणून कार्यरत असून तो शूटर असल्याची माहिती समोर आली आहे.
शिंजो आबे यांचे टोपणनाव ‘द प्रिन्स’ आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्रमंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ते नातू होते. २००६ साली िंजो आबे पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. महायुद्धानंतर जपानची धुरा सांभाळलेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली. २००६ ते २००७ असे एक वर्ष आणि नंतर २०१२ ते २०२० पर्यंत सलग आठ वर्षे त्यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा वाहिली. शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. २०२० मध्ये आरोग्याच्या कारणावरून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर योशिहिडे सुगा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर