हेरगिरी प्रकरणी हवाई दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला अटक Photo : X
आंतरराष्ट्रीय

हेरगिरी प्रकरणी हवाई दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला अटक

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंध प्रस्थापित करून त्यांना संरक्षण क्षेत्राविषयी कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपावरून भारतीय हवाई दलाच्या माजी कर्मचाऱ्याला आसाममधील तेझपूर येथे अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी कुलेंद्र शर्मा हा ज्युनियर वॉरंट ऑफिसर म्हणून २००२ मध्ये भारतीय हवाई दलातून निवृत्त झाला आहे.

Swapnil S

तेजपूर : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंध प्रस्थापित करून त्यांना संरक्षण क्षेत्राविषयी कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपावरून भारतीय हवाई दलाच्या माजी कर्मचाऱ्याला आसाममधील तेझपूर येथे अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी कुलेंद्र शर्मा हा ज्युनियर वॉरंट ऑफिसर म्हणून २००२ मध्ये भारतीय हवाई दलातून निवृत्त झाला आहे.

विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलेंद्र शर्मा हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करत होता, त्यामुळे आम्ही त्याला अटक केली. त्याची चौकशी केली जात आहे. आम्हाला कुठल्यातरी अज्ञात व्यक्तींबरोबर काही कागदपत्रे शेअर केली जात असल्याचे आढळून आले. आम्ही त्यांची सत्यता पडताळून पाहात आहोत," अशी माहिती सोनितपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरिचरण भुमिज यांनी दिली. तसेच त्यांनी ही कागदपत्रे संरक्षणविषयक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलिसांनी शर्माकडून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. ही उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली जातील आणि त्यानंतर आम्हाला अधिकची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. काही अत्यंत गोपनीय माहिती शेअर केल्याचे आम्हाला आढळले आहे. तो कोणाबरोबर माहिती शेअर करत होता आणि या कागदपत्रांची सत्यता आम्ही याची आम्ही पडताळणी करत आहोत,' असेही ते म्हणाले.

पोलिसांनी सांगितले की, त्याला भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये करणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, गुन्हेगारी कट रचणे, गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे अशा आरोपांखाली अटक करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात