इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टरचा अपघात; ८ जणांचा मृत्यू X
आंतरराष्ट्रीय

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टरचा अपघात; ८ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर पाम तेलाच्या मळ्यांदरम्यान उड्डाण करत असताना एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

Swapnil S

जाकार्ता : इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर पाम तेलाच्या मळ्यांदरम्यान उड्डाण करत असताना एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

घटना काय

‘पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा’ या कंपनीच्या मालकीच्या एअरबस एच-१३० हेलिकॉप्टरने गुरुवारी पश्चिम कालीमंतन प्रांतातील मेल्वी जिल्ह्यातून उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांतच या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. हे हेलिकॉप्टर कुबू राया जिल्ह्यातील पाम तेलाच्या दुसऱ्या मळ्याकडे जात होते.

बचावकार्य आणि शोध

राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्था तसेच परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला सेकाडाऊ जिल्ह्यातील दाट जंगलात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून दोन क्रू मेंबर्स आणि सहा प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांमध्ये एका मलेशियन नागरिकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातांचे सत्र

सुमारे २७ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि अनेक बेटांवर विस्तारलेल्या इंडोनेशियामध्ये वाहतूक अपघातांचे प्रमाण मोठे आहे. गेल्या काही वर्षांत येथे विमान आणि हेलिकॉप्टर कोसळण्याच्या, तसेच नौका बुडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

Maratha Reservation : आंदोलन रोखण्यास न्यायालयाचा नकार