Iran vs US-Israel War : युद्ध लवकरच संपणार! ट्रम्प यांचे संकेत; जगभरातील अर्थव्यवस्था, शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : युद्ध लवकरच संपणार! ट्रम्प यांचे संकेत; जगभरातील अर्थव्यवस्था, शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम

पश्चिम आशियामध्ये गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना एक महत्वाचे विधान केले आहे.

Swapnil S

तेहरान/तेल अवीव/वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियामध्ये गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना एक महत्वाचे विधान केले आहे. "आम्ही लवकरच इराणमधून बाहेर पडू, कदाचित दोन ते तीन आठवड्यांत हे लष्करी ऑपरेशन संपू शकते," असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, हे युद्ध थांबवण्यासाठी इराणने कोणताही करार करावा, अशी अट अमेरिकेने ठेवलेली नाही. ट्रम्प यांनी इराणमधील 'ऑपरेशन एपिक फ्युरी' पुढील दोन ते तीन आठवड्यांत संपवण्याचे संकेत दिले आहेत. ज्याचा जगभरातील अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

इराणचा अमेरिकन कंपन्यांना इशारा

दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी आक्रमक पवित्रा घेत गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला आणि बोईंग यांसारख्या १८ प्रमुख अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. मात्र, ट्रम्प यांनी ही धमकी फेटाळून लावत म्हटले की, ‘इराणकडे आता धमकावण्यासाठी काहीच उरलेले नाही’.

‘नाटो’ हा कागदी वाघ : ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नाटो’ला कागदी वाघ म्हटले आहे. नाटोमधून बाहेर पडण्याचा अमेरिका गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ते नाटोमुळे आधीच फारसे प्रभावित नव्हते आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही तीच भावना आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.इराण युद्धात ‘नाटो’ देशांनी अमेरिकेला पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर हे विधान आले आहे. अमेरिकेची इच्छा होती की नाटो देशांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आपली युद्धनौका पाठवावी, परंतु त्यांनी तसे केले नाही.

‘होर्मुझ’मार्गे ९४,००० टन ‘एलपीजी’ घेऊन दोन जहाजे भारतात

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून ‘एलपीजी’(स्वयंपाकाचा गॅस) वाहून आणणारी दोन मोठी जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी पार करून सुखरूपपणे भारतात दाखल झाली आहेत. पहिले जहाज, 'टीवायआर' हे ३१ मार्च रोजी मुंबईत पोहोचले.

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

Mumbai : मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम'

निबंधकांच्या मंजुरीनंतरच जन्म, मृत्यू नोंदणी रद्द; दुरुस्तीसाठी नवे कडक नियम

महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना; समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती

Mumbai : दुसऱ्या टप्प्यात २९४ आस्थापनांना नोटीस; मराठी पाट्या प्रकरणी ९,७९८ आस्थापनांची झाडाझडती