आंतरराष्ट्रीय

इस्रायलमध्ये कोसळू शकते नेत्यान्याहू यांचे सरकार; सक्तीच्या लष्करी सेवेतून सूट देण्यावरून वाद

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार अल्पमतात आले आहे. शास पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. एक दिवस आधी ‘युनायटेड तोराह ज्यूडाईम’ (यूटीजे) पक्षानेही सरकारमधून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे.

Swapnil S

तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार अल्पमतात आले आहे. शास पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. एक दिवस आधी ‘युनायटेड तोराह ज्यूडाईम’ (यूटीजे) पक्षानेही सरकारमधून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे.

इस्रायलच्या १२० सदस्यांच्या संसदेत सरकार स्थापन करण्यासाठी ६१ जागा आवश्यक आहेत. या दोन्ही पक्षांच्या या निर्णयामुळे सत्ताधारी युतीकडे फक्त ५० जागा उरल्या आहेत.

शास पक्षाने म्हटले आहे की, जड अंतःकरणाने आपल्याला हे स्वीकारावे लागेल की आपण सरकारचा भाग होऊ शकत नाही. आम्ही सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि काही कायद्यांवर युतीला पाठिंबा देऊ शकतो.

सक्तीच्या लष्करी सेवेतून सूट देण्यावरून वाद

सत्ताधारी युतीतील या वादाचे मुख्य कारण म्हणजे ऑर्थोडॉक्स धार्मिक विद्यार्थ्यांना लष्करी सेवेतून देण्यात आलेली सूट हे आहे. हे विद्यार्थी बऱ्याच काळापासून सक्तीच्या लष्करी सेवेतून सूट घेत आहेत. नेत्यान्याहू सरकारने अलीकडेच ही सूट मर्यादित करण्यासाठी एक विधेयक आणले, ज्यामुळे शास पक्ष आणि यूटीजेने सरकार सोडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसमधील काही नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येण्याची शक्यता; जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने नाराजी

बाबर क्रूर, अकबर सहिष्णू, तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा’; NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

२० कोटींच्या १४ शौचालयांच्या प्रकल्पाला स्थगिती; शहरातील अतिरिक्त आयुक्त दोषी आढळल्यास कारवाई करणार - राहुल नार्वेकर

तेल वाहतूक कंत्राटांत एससी, एसटी आरक्षण बंधनकारक; केंद्राचा निर्णय हायकोर्टाने कायम ठेवला

त्रिभाषा सूत्र लागू करणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम