भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा ही झाली. एक्स
आंतरराष्ट्रीय

कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच सुरु होणार

भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय सुधारण्यासाठी उभय देशांमध्ये बुधवारी अनेक मुद्यांवर चर्चा झाली.

Swapnil S

बीजिंग : भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय सुधारण्यासाठी उभय देशांमध्ये बुधवारी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यात कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच सुरु करण्याची चीनने तयारी दर्शवली आहे. चीनच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा ही झाली.

या बैठकीनंतर चीनने सांगितले की, भारतासोबत झालेल्या करारांची अंमलबजावणी केली जाईल. तर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, दोन्ही देशांमधील मतभेद सोडवण्यासाठी चीन प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यास तयार आहे.

२०१९ नंतर पहिल्यांदाच भारताचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बीजिंगचा दौरा केला होता.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल