फोटो सौजन्य : X
आंतरराष्ट्रीय

'लष्कर'च्या दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या; भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये होता हात

‘लष्कर-ए-तोयबा’चा कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद याला रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी ठार मारले. खालिद हा नेपाळमधून भारतविरोधी कारवाया करण्यात सक्रिय होता.

Krantee V. Kale

इस्लामाबाद : ‘लष्कर-ए-तोयबा’चा कुख्यात दहशतवादी रझाउल्ला निजामानी उर्फ ​​अबू सैफुल्ला खालिद याला रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी ठार मारले. खालिद हा नेपाळमधून भारतविरोधी कारवाया करण्यात सक्रिय होता. तसेच भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता.

माहितीनुसार, पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याची हत्या केली. पाकिस्तान सरकारनेही त्याला सुरक्षा पुरवली होती, असे समजते. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने सर्व लष्कर-ए-तोयबाच्या सर्व दहशतवाद्यांना उघड्यावर फिरू नका असे बजावले होते. निजामानी दुपारी सिंधमधील माटली येथील त्याच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर जवळच एका क्रॉसिंगजवळ हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली.

खालिद हा ‘लष्कर-ए-तोयबा’चा एक प्रमुख दहशतवादी होता. तोयबाने भारतात हल्ले करण्याचे टास्क त्याला दिले होते. त्यानंतर त्याने नेपाळमध्ये आपला अड्डा तयार करून भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. मात्र, याबाबत भारतातील गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर तो नेपाळमधून पळून पाकिस्तानात जाऊन लपला होता. तो भारताला हव्या असलेल्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता. सैफुल्लाह हा वेगवेगळ्या नावांनी नेपाळमधून दहशतवादी कारवाया घडवून आणत होता. अखेर अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानमध्ये त्याला गोळ्या झाडून ठार केले.

तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सैफुल्लाहचा हात

भारतात झालेल्या तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागे सैफुल्लाहचा हात असल्याचे समोर आले होते. सैफुल्लाहने २००६ साली नागपूरमधील ‘आरएसएस’च्या मुख्यालयावर हल्ला घडवून आणला होता. २००१ मध्ये रामपूरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यामागेही त्याचा हात होता. तसेच २००५ मध्ये त्याने बंगळुरूमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास