मलेशियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग  संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

मलेशियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

कुआलालंपूरहून जेद्दाहच्या दिशेने जाणाऱ्या मलेशिया एअरलाइन्सच्या एका विमानाला तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले.

Swapnil S

चेन्नई : कुआलालंपूरहून जेद्दाहच्या दिशेने जाणाऱ्या मलेशिया एअरलाइन्सच्या एका विमानाला तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले. विमानातील इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आल्यानंतर विमानतळावर तातडीने 'फुल इमर्जन्सी' (पूर्ण आणीबाणी) घोषित करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, 'मलेशिया एअरलाइन्स'च्या 'एमएच १५६' या विमानात १८६ प्रवासी होते. विमानाने चेन्नई विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले असून, लँडिंगपूर्वीच विमानतळ प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली होती. विमानाच्या 'इंजिन क्रमांक २' मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. "एअरलाइन्सची आणि विमानतळाची तांत्रिक पथके या बिघाडाची सखोल पाहणी करत आहेत. सध्या विमानतळावरील इतर विमान सेवा पूर्ववत आणि सामान्यपणे सुरू आहे, अशी माहिती विमानतळाच्या प्रवक्त्याने दिली.

लँडिंगनंतर विमानाला टो व्हेहिकलच्या साहाय्याने पार्किंग स्लॉटमध्ये आणण्यात आले. विमानामधील सर्व १८६ प्रवाशांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली असून त्यांच्या निवासाची व्यवस्था विमानतळावरच करण्यात आली आहे. दरम्यान, याच दिवशी तिरुचिरापल्ली येथून सिंगापूरला जाणाऱ्या 'एअर इंडिया एक्सप्रेस'च्या विमानालाही तांत्रिक बिघाडामुळे चेन्नई विमानतळाकडे वळवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : 'म्हात्रेसारख्यांना मोकाट फिरण्याचा अधिकार नाही' - सर्वोच्च न्यायालय

National Film Awards 2026 : ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला

गणेशोत्सवात सजावटीचा नवा ट्रेंड; यंदा LED, इको-फ्रेंडली मखर अन् कृत्रिम फुलांना पसंती

उसनवारीबाबत दोन नोटिसा; मंत्री कार्यालयांचा प्रतिसाद नाही